Share

तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपाला हवेत ७७ कोटी ७३ लाख रुपये, राज्यशासनाकडे पाठवला प्रस्ताव!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाट रोखण्यासाठी महापालिकेतर्फे तयारी केली जात आहे. त्यानुसार आगामी तीन महिन्यांसाठी ६८ कोटी रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यात आठ कोटी ९२ लाख रुपयांची जुनी थकबाकी असल्याने एकूण ७७ कोटी ७३ लाख रुपये महापालिकेला मिळावेत, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाची लाट नियंत्रणात आणण्यासोबतच जे नागरिक कोरोनाबाधित आढळून आले, त्यांच्यावर उपचार करण्याचे काम महापालिकेतर्फे गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. आरटीपीसीआर, ॲन्टीजेन चाचण्या करणे, बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून दहा दिवस उपचार करणे, त्याठिकाणी जेवणासह इतर व्यवस्था केली जात आहे.

त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून महापालिकेला आत्तापर्यंत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत ३७ कोटी ३६ लाख, तर जिल्हा नियोजन समितीमार्फत १० कोटी १२ लाख असा ४७ कोटी ४८ लाख रुपये निधी मिळाला आहे. असे असले तरी महापालिकेला अद्याप आठ कोटी ९२ लाख रुपयांचे देणे आहे. त्यानुसार राज्य शासनाला आगामी तीन महिन्यांसाठी ७७ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!