बीड: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्याला चांगलाच फटका सहन करावा लागला होता. गेल्या काही दिसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे बीडकरांना दिलासा मिळत होता. मात्र मागच्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या काहीशी वाढतच आहे. प्रमाणही अधूनमधून वाढत आहे. बाजारांमध्ये लोकांची गर्दी सर्वकाही सुरळीत असल्यासारखीच आहे. लोकांनी वर्तन सुधारले नाही अन् रुग्णसंख्येची वाढ कायम राहीली, तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची तंबी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली आहे.
जिल्ह्यात सध्या लेव्हल तीनचे निर्बंध लागू आहेत. सदरील निर्बंधामध्ये अत्यावश्यक तसेच इतर सेवा देणाऱ्या आस्थापना दैनंदिन सुरू असल्याने जिल्ह्यातील विविध शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढलेलीच आहे. १० जून पासून पाच दिवसांपैकी तीन दिवस रुग्णसंख्या दीडशेच्या पुढे आहे. दोन दिवस दीडशेच्या आत आहे. मंगळवारी १५४ रुग्ण आणि पॉझिटीव्हीटी रेट ५.९९ टक्क्यांवर गेला. त्यामुळे लोकांनी कोविडचे नियम पाळावेत, गर्दी टाळावी, असे आवाहन रवींद्र जगताप यांनी केले.
शहर आणि ग्रामीण भागांत लोकांची गर्दी होत आहे. म्हणूनच रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे भविष्यात पुन्हा कडक निर्बंधाचे वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गरज असेल तरच बाहेर पडा, सुरक्षित अंतर पाळा, मास्क- सॅनिटायझर वापरा, शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी टाळा, असे आवाहन जिल्हाधिकारी जगताप यांनी केले. रेस्टॉरंट, हॉटेल या केवळ ५० टक्के उपस्थितीमध्ये निर्देशित केलेल्या वेळेत चालू ठेवण्यात याव्यात. अन्यथा कार्यवाहीचा इशारा दिला आहे. सायंकाळी पाच नंतर संचारबंदी असल्याने आवश्यक कारणांसाठीच बाहेर पडावे. सध्या आपण लेव्हल तीनमध्ये असून जर चारमध्ये गेलो तर पुन्हा कडक निर्बंधांचा सामना करावा लागेल, असे रवींद्र जगताप म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपाला हवेत ७७ कोटी ७३ लाख रुपये, राज्यशासनाकडे पाठवला प्रस्ताव!
- बीडमध्ये रेशन दुकानदारकडून लाच घेतना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!
- राहुल गांधींची वादग्रस्त प्रकरणी टीका आणि योगींनी संतापात राहुल गांधींची लाजच काढली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

