🕒 1 min read
यवतमाळ : दुर्गापूजा साजरी केली जात असतानाच बांगलादेशात हिंदू मंदिरांवर काही समाजकटकांनी हल्ले केले. त्यानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये तीन जण मारले गेले असून, २२ जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. हिंसाचारात ६० जण जखमी झाले आहेत. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखेने बांग्लादेशात वास्तव्यास असलेल्या हिंदू बांधव व हिंदू मंदिरावर दहशतवाद्याद्वारे होणाऱ्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. याबाबत निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले.
बांग्लादेशात वास्तव्यास असलेल्या हिंदू बांधवांवर काही असामाजिक तत्वे व दहशतवाद्यांकडून हल्ले, अत्याचार होत आहे. हिंदू मंदिरांची तोडफोड केली जात आहे. हिंदू महिलांना छळले जात आहे. हा प्रकार गंभीर असून हिंदूंमध्ये संताप वाढवणारा आहे. भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू-शिख यांच्यावर हल्ले होत आहे. बांगलादेशातील हिंदू बांधवांच्या पाठीशी केंद्र सरकारने उभे रहावे, बांगलादेश सरकारने अल्पसंख्य हिंदूंना मदत करावी. दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने केली आहे.
नेमके प्रकरण काय?
ढाक्यापासून सुमारे १०० किलोमीटरवर असणाऱ्या कमिला येथे दंगलींना सुरुवात झाली. कथित ईशनिंदा झाल्याच्या आरोपावरून या दंगली सुरू झाल्या. दंगली सुरू होताच प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. चांदपूर जिल्ह्यातील हाजीगंज, छट्टोग्राम जिल्ह्यातील बन्शखली आणि कॉक्स बझार जिल्ह्यातील पेकुआ या ठिकाणी हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ
- ‘आर्यनविरोधात कट रचला जातोय, त्याची अटक चुकीची’; रोहतगींचा न्यायालयात युक्तीवाद
- नाइट सूट’मध्ये करवा चौथ साजरा; रवीना टंडनचे फोटो व्हायरल
- महत्त्वाचा निर्णय! रेशन धान्यांसाठी यापुढे कोरोना लसीकरण सक्तीचे
- महिलांना ‘मिनी ट्रॅक्टर’ कधी मिळणार? समाजकल्याण विभागाला निधीची प्रतिक्षा

