Share

महिलांना ‘मिनी ट्रॅक्टर’ कधी मिळणार? समाजकल्याण विभागाला निधीची प्रतिक्षा

Published On: 

औरंगाबाद : महिला बचत गटांना स्वावलंबी होण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने मिनी ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी समाजकल्याण विभागाच्या वतीने मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु यंदा समाजकल्याण विभागालाच निधीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली असल्याने महिलांना मिनी ट्रॅक्टर मिळणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महिला बचत गटांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी चालना मिळावी यासाठी मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ट्रॅक्टर खरेदीसाठी ३ लाख १५ हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी महिला बचत गटांची निवड केली जाते. यंदा ६० महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी निधी दिला जाणार आहे. ६० मिनी ट्रॅक्टरसाठी १ कोटी ८९ लाख रुपयांची गरज असून या निधीची मागणी समाजकल्याण विभागाने वरिष्ठ स्तरावर केली आहे.

मात्र  निधी मिळाला नसल्याने समाजकल्याण विभागालाच निधीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. आधीच कोरोनामुळे अनेक महिलांना आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागले. त्यात मिनी ट्रॅक्टरचा आधार होईल. अशी अपेक्षा महिला बचत गटांना आहे. परंतु समाजकल्याण विभागालाच निधीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली असल्याने महिला बचत गटांनी काय करावे? असा प्रश्न महिला बचत गटांना पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!