Share

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

Published On: 

🕒 1 min read

पुणे – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली असून आता कर्मचाऱ्यांना17 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. अधिकाऱ्यांना पाच हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना अडीच हजार रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी काल केली. या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे 93 हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे.

दरम्यान, राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळानं आपल्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांसाठी 17.17 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काल मध्यरात्री पासून ही भाडेवाढ लागू झाली.भाडेवाढीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. काल संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आणि लगेचच ही भाडेवाढ लागू करण्यात आली.

ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलं आहे अशा प्रवाशांकडून वाहक सुधारित तिकिटाच्या रक्कमेची आकारणी करतील, असंही महामंडळानं स्पष्ट केलं आहे.नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी आणि अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच 6 किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ पाच रुपयाच्या पटीत असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!