मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एसीबीने केलेल्या कारवाईमुळे अटकेत आहे. त्याच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरणात अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु आहे. यावेळी त्याच्या वकिलांकडून युक्तीवाद झाला.
आर्यन खानला चुकीच्या पद्धतीनं अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळून आलेलं नाही. आर्यन खान विरोधात कट रचला जात आहे, असा गंभीर आरोप माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडताना केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरु आहे. यावेळी आर्यन खानच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद सुरु आहे.
मला आज दुपारी जामीन अर्जावरील एनसीबीच्या उत्तराची एक प्रत मिळाली आणि मी एक प्रत्युत्तर दाखल केलं आहे. हे प्रकरण 2 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. आर्यन हा ग्राहक नव्हता. आर्यन खानला विशेष अतिथीच्या रुपात क्रुझवर आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याला प्रतिक गाभा याने आमंत्रित केलं होतं. प्रतिक गाभा हा एक आयोजक आहे. त्याने आर्यन आणि आरोपी अरबाज मर्चंट या दोघांना एकाच व्यक्तीने आमंत्रित केलं होतं. ते दोघे एकत्र क्रुझवर गेले होते, असंही मुकूल रोहितगी यांनी सांगितलं.
दरम्यान,आर्यनकडे कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळालं नाही. त्यांच्याविरोधात आरोप हा आहे की, आरोपी अरबाज मर्चंट सोबत क्रुझवर आला होता आणि त्याच्यावर ड्रग्स ठेवल्याचा आरोप आहे. आर्यन विरोधात कट रचला जातोय. आर्यन अरबाजसोबत आला. आर्यनला अरबाजकडे असलेल्या गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला जातोय. कुणाच्यातरी बुटामध्ये काय आहे, त्याच्याशी आर्यनचा काही संबंध नाही, असा दावा रोहतगी यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांकडूनही सुधारित तिकिटाच्या रक्कमेची आकारणी केली जाणार
- ‘ठाकरे’ सरकारतर्फे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ; आ. डॉ. मनीषा कायंदेंच्या मागणीला यश!
- ‘भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात’, रामदास आठवलेंचे खळबळजनक वक्तव्य
- हल्ली बायका पण असा चोमडेपणा करत नाहीत; नवाब मलिकांवर क्रांती भडकली
- समीर वानखेडे कोणत्याही पक्षासाठी काम करत नाहीत- क्रांती रेडकर


