मुंबई : मागील काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले आहेत. काल शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे.
दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजेंच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. ‘संभाजीराजेंच्या डोक्यात राजकारण नाहीये. ते मराठा तरुणांचं संघटन करण्याचं विधायक काम करतायत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचे स्वरूप देखील ते समजदारवृत्तीने करतील,’ असं भाष्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय.
थोरात-पवार भेट –
आज शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात भेट झाल्याची माहिती मिळत आहे. पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासोबतच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर देखील च्या भेटीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. महाविकास आघाडी सरकार मध्ये महामंडळा बाबतीत काँग्रेसच्या वाट्याला जास्त महामंडळ द्यावीत याबद्दल देखील शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच राज्यात आजपासून केलेला अनलॉक, कोरोनाची राज्यातील परिस्थिती आणि राज्यासमोर उद्भवलेले पदोन्नती आरक्षणाचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस, खडसे यांच्यानंतर आता रामदास आठवले घेणार शरद पवारांची भेट
- मोदी सरकारनेच अदर पुनावाला यांना धमकी दिली; मुश्रीफांचा गंभीर आरोप
- संतापजनक : समाजकंटक पर्यटकांनी केली तोरणा किल्ल्याच्या बुरुजाची नासधूस
- ‘पहाटेच्या शपथविधीनंतर साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती?’
- ‘ट्विटरच्या जिवावर निवडणुका जिंकल्या, मग आता भाजपचा विरोध का?’ शिवसेनेचा मोदींना सवाल


