कल्याण – स्वतःला बुवा किंवा महाराज समजणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे व्यक्ती जवळपास दररोज लोकांना उपदेश करत किंवा कसं वागावं, काय करावं हे सांगत फिरत असतात. मात्र, स्वतः हे सगळं किती आचरणात आणतात? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यावर पडतो.
व्हायरल होणारा हा व्हिडिओ कल्याण तालुक्यातील द्वारली या गावातील आहे. या गावातील स्वतःला बुवा आणि महाराज समजणाऱ्या गजानन चिकणकर यानं आपल्या पत्नीला जबर मारहाण केली आहे. या व्यक्तीला दोन बायका असून तो भक्तांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत प्रबोधन करत असतो. मात्र, पहिली पत्नी वयस्कर असल्यानं त्या काम करत नसल्यानं तो अनेकदा पत्नीला मारहाण करतो आहे असं यात दिसत आहे.
हा व्हिडिओ नातवानेच व्हायरल केला आहे. हा व्यक्ती आपल्या पत्नीला अमानुषपणे मारहाण करत असताना आजबाजूला इतरही अनेक महिला आहेत, मात्र कोणीही या महिलेच्या मदतीला धावलं नाही. हा व्यक्ती महिलेला वारंवार जाब विचारात मारहाण करत आहे. त्यानं महिलेला लाथेनं मारण्यासोबतच हातात बादली घेऊनही मारहाण केली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत घटनास्थळ गाठलं होतं. यावेळी गजानन बुवा चिकणकर वारीसाठी आळंदीला गेले असल्याचं कुटुंबाने सांगितलं. दरम्यान याप्रकरणी त्यांच्या पत्नीने पोलिसांत कोणतीही तक्रार दिलेली नाही. पोलिसांनी कुटुंबाला समज दिली असून गजानन बुवा चिकणघर यांनाही समज दिली जाणार आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता या बुवावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्ता नसल्याने फडणवीस अस्वस्थ, सरकार स्थापनेसाठी ते तळमळत आहेत’, खडसेंची कोपरखळी
- पदार्पणातच कारकिर्द संपुष्टात! ओली रॉबीन्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबीत
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- चोराच्या उलट्या बोंबा : मी उपचारासाठी देश सोडला; पळून गेलेलो नाही – चोक्सी
- 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला राज्यात प्रारंभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
