Share

‘पहाटेच्या शपथविधीनंतर साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती?’

Published On: 

मुंबई – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असून आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत. राज्य सरकारने केंद्रावर जबाबदारी टाकण्याचे प्रयत्न सुरु केले असून यामुळे मराठा समाजात आणखी रोष वाढू लागला आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी मराठा मोर्चा काढणाऱ्या नरेंद्र पाटील यांना लक्ष्य केले होते. यावरुन आता भाजपनेते निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केल्याने एक नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. या टीकेला आता राणे यांनी उत्तर दिले आहे.

पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर अजित पवार यांची काय लायकी राहिली असती, अशी जळजळीत टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करुन अजित पवार यांना हा सवाल विचारला आहे.

राणे आपल्या ट्वीट ,मध्ये म्हणतात, अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!