औरंंगाबाद : लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात वाहन चोरटे सुसाट सुटले असून चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून आणखी पाच दुचाकी लंपास केल्या आहेत. पोलिसांची नाकाबंदी भेदत वाहन चोरटे दुचाकी वाहने हातोहात लंपास करीत असल्याने वाहनधारक हवालदिल झाले आहेत.
शेख इम्रान अहेमद (वय ३२, रा.न्यु, रोड.मंजूरपुरा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीडी-७७८६) चोरट्याने १६ मे रोजी घराजवळून चोरून नेली. अफरोज सरवर अहेमद शेख (वय ३९, रा.पटेलनगर, उस्मान कॉलनी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीव्ही-३४१९) चोरट्याने १० मे रोजी जामा मशिदीजवळून चोरून नेली. अविनाश भाऊराव हाडे (वय ५२, रा.वरद टॉवर, खोकडपुरा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एएक्स-२५४४) चोरट्याने १५ मे रोजी घराजवळून चोरून नेली.
अंबादास बद्दुसिंग जाधव (वय ३४, रा.रेवा रेसीडेन्सी अपार्टमेंन्ट, उस्मानपुरा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीई-९४१२) चोरट्याने १३ मे रोजी पटवर्धन हॉस्पीटल, रेल्वेस्टेशन रोड येथून चोरून नेली. प्रविण कमलाकर भोजणे (वय ३७, रा.चिनार आर्वेâड, पडेगाव) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीए-६६७५) चोरट्याने घराजवळून चोरून नेली. विविध भागातून दुचाकी लंपास करणा-या चोरट्याविरूध्द सिटीचौक-२, क्रांतीचौक, वेदांतनगर आणि छावणी पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराज, मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये!’
- ‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर
- मोठी बातमी! केंद्राकडून ‘म्युकरमायकोसिस’चा साथरोग कायद्यात समावेश, नवीन नियम लागू
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

