Share

…’तर पुढील एक-दोन दिवसांत भाजी मार्केट देखील बंद करणार’

Published On: 

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

मात्र, अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने नियम अधिक कठोर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागरिकांच्या हा हलगर्जीपणामुळे आता भाजी मार्केट देखील बंद होण्याची शक्यता आहे. ज्या भाजी मार्केटमध्ये गर्दी होते, ती मार्केट एक, दोन दिवसांत बंद करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांना दिल्या आहेत, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले आहेत.

नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. अन्यथा पूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही. रेल्वेदेखील येत्या काळात प्रवाशांसाठी काही गाईडलाईन्स काढण्यात येण्याची शक्यता आहे. वारंवार सरकार सांगताय नियमांचं पालन करा, मात्र नागरिक ऐकत नाहीत, असंही मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!