हिंगोली : परिसरात हळदीचे दर घसरले आहेत. तरीही संचारबंदीमध्येही मात्र आवक सुरुच आहे. याच बरोबर सोयाबीन, हरभऱ्याचे भाव मात्र अद्यापही स्थिरच आहेत. तर मागच्या आठवड्यापेक्षा हळदीच्या दरामध्ये सातशे रुपयांनी घट झालेली आढळून आली आहे. शुक्रवारी साडेपाच हजार तर शनिवारी ६ हजार पोत्यांची हळदीची आवक वाढली आहे.
हिंगोली जिल्हाची बाजारपेठ पुर्ण मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे. हिंगोलीसह परभणी, नांदेड, काही लातूरचा भागातून हळद विक्रीसाठी येत असते. यंदा मागच्या आठवड्यामध्ये हळदीचे दर साडेआठ हजारांच्या जवळपास आले होते. अनेकांना ८ हजार २५० रुपयांचा भाव मिळाला होता. पण गुरुवारी तो भाव ८ हजारांवर आला होता. आता मात्र त्यात देखील घट झालेली दिसून येते. शनिवारी दर ७ हजार ते ७ हजार ७०० रुपये झाला होता. भाव कमी झाल्याने हळदीच्या आवक कमी होण्याची शक्यता होती. परंतू आवक मात्र दररोज वाढत असताना दिसून येत आहे.
सध्या १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून संचारबंदी सुरु झाली आहे. तरीही हळदीची आवक मात्र वाढल्याचे चित्र मोंढा बाजारात पहावयास मिळत आहे. शुक्रवारी साडेचार हजार पोत्यांची आवक झाली होती. तर शनिवारी हळीदीने भरलेल्या वाहनांच्या रांगा मोंढा परिसरात लागल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. त्यातच वाहनाचे टोकन देवून वाहने मोंढ्याच सोडली. मोंढा परिसरात मोठी रांगा लागल्याने संत नामदेव कॉटन मार्केट यार्डामध्ये हळदीने भरलेले ट्रक तसेच टॅम्पोच्या रांगा लागलेल्या आहेत. तर जुन्या मोंढा परिसरात हरभरा, सोयाबीन तुरीची आवक वाढल्याचे देखील दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा
- आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंचे तिहेरी सुवर्णयश
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

