Share

वीर दासने ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण , म्हणाला..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता वीर दास आणि स्टँड-अप कॉमेडियन याने अमेरिकेतल्या शोमध्ये भारतीयांबद्दल वक्तव्यावरून सध्या देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी, वीर दासच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर आता वीर दासने या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे.

अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास  (Veer Das) वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो, अशा प्रकारचे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली होती.

याबाबत वीर दास म्हणाला की, ‘माझे काम लोकांना हसवणे आहे. जर तुम्हाला ते विचित्र वाटत असेल तर तुम्ही हसू नका. मी आतापर्यंत कधीही सेन्सरशिपचा सामना केलेला नाही. तसेच लोकांना हसवण्यासाठी त्यांच्यात प्रेम वाढवण्यासाठी भारतात अधिक कॉमेडी क्लबची आवश्यकता आहे,’ असेही त्याने यावेळी म्हटले.

वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर (You tube) ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ हा व्हिडिओ अपलोड केला आहे. वॉशिंग्टन डी सी मधील जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये त्याच्या अलीकडील सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता. त्यात त्याने म्हटले, मी अशा भारतातून येतो जिथे आम्ही दिवसा स्त्रीची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो. त्याच्या वक्त्याव्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला होता. यावरून त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!