मुंबई : राजकीय नेत्यांनी वेदांता प्रकल्पावरुन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. अशातच आता अमोल मिटकरी यांनी देखील ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल मिटकरी यांची प्रतिक्रीयाः
वेदांत फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटीची सवलत दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटीची ! तरीही हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरात मध्ये शिंदे सरकारने घालवला, असल्याचं मिटकरींनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. लाखो हिंदु तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खुश केलं असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदेंवर केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने लाखो हिंदू तरुणांना बेरोजगार केला असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिलं उत्तरः
सर्वात महत्वाचा मानला जाणार हा प्रकल्प गुजरातला गेला कसा याबाबत एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे. त्यावेळी या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. तळेगावजवळील 1100 एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. 30 ते लाईफ सायन्स 35 हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉन हा 1.54 लाख कोटी गुंतवणूक असलेला उद्योग अचानक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग पावणे दोन लाख कोटींचा आहे. या उद्योगासोबत १०७ इतर छोटे-मोठे उद्योग उभे राहणार होते. याच्या माध्यमातून ७० हजार ते १ लाख रोजगार निर्माण होणार होते.
महत्वाच्या बातम्याः
- Vedanta Foxconn | शिंदे-फडणवीस सरकार झोपले होते का? वेदांत-फॉक्सकॉन कंपनीवरुन घमासान
- Most Luxurious Cars | 2022 मधील जगातील 5 सर्वात आलिशान कार, किंमत ऐकूनच थक्क व्हाल!
- Chandrakant Patil | गोंडवाना विद्यापीठात वसतिगृह उभारण्याबाबत शासन सकारात्मक – चंद्रकांत पाटील
- Amol Mitkari | “…यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना मुख्यमंत्र्यांनी नक्कीच खुश केलं”, अमोल मिटकरींचे आरोप
- Raj Thackeray | राज ठाकरेंनी मनसे युतीबाबत केलं स्पष्ट, दिले कार्यकर्त्यांना ‘हे’ आदेश


