Share

MNS | “वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेलाच कसा?, याबाबत चौकशी करा” मनसेची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळतं आहेत. यामुद्यावर अनेक राजकीय नेत्यांनी आप-आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी हा प्रकल्प गुजरातला जाणं हे शिंदे-फडणवीसांचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. अशातच मनसे पक्षाने एक अनोखी मागणी केली आहे.

काय आहे मनसे पक्षाची मागणी ?

वेदांता सारखा प्रकल्प राज्याबाहेर जातो याची चौकशी झाली पाहिजे, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलं आहे. संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

पुढे ते असंही म्हणाले की, हा प्रकल्प राज्यात राहिला असता तर राज्यातील तरुणांना रोजगार मिळाले असते. यात कोणीही राजकारण करू नका. मुंबईचे महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही. मुंबई फक्त मराठी माणसाचीच आहे. एखादा प्रकल्प गुजरातला जाणे हे योग्य नाही. गुजरात असं काय सोई-सुविधा देत आहे याचा राज्यकर्त्यांनी विचार करावा.

बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे मांडत आहेत-

तसेच, पत्रकारांनी संदीप देशपांडे यांना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत विचारण्यात आले. त्यावर दसरा मेळावा कधी आणि कुठे होतोय हे महत्त्वाचे नसून, बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे मांडतायत. त्यामुळे कोणाचा मेळावा कुठे होतो याला फार महत्त्व नसल्याचं देशपांडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!