🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- भाजप खासदार आणि पिलीभीतचे उमेदवार वरुण गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. महाआघाडीचे उमेदवार हे पाकिस्तानचे प्रतिनिधी आहेत. त्यांना मतदान करणे म्हणचे पाकिस्तानला मतदान करण्यासारखे आहे, असे त्यांनी म्हटल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
‘टाइम्स नाऊ’ने याबाबतचे वृत्त दिले असून वरुण गांधी बोलतानाचा एक व्हिडिओही त्यांनी प्रसारित केला आहे. यात वरुण गांधी म्हणतात, तुम्ही भारतमातेच्या नावावर मतदान करण्यास तयार आहात का ? तुम्ही भारताबरोबर आहात की पाकिस्तानबरोबर ? जर तुम्ही महाआघाडीला विजयी केले तर हे पाकिस्तानचे माणसे आहेत. मी हे चुकीचे बोलत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

