Share

बारावीच्या परीक्षांबाबत केंद्र-राज्य सरकारची बैठक झाली; वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती !

Published On: 

मुंबई : देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्यावर्षी पासून राज्यासह देशभरात कोरोना रोगाने माजवलेल्या हाहाकारामुळे शैक्षणिक क्षेत्रला देखील मोठा फटका बसला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महिन्याभरापूर्वीच सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश निशंक पोखरीयाल यांनी जाहीर केले. यासोबतच, बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या असून त्यांची तारीख नंतर जाहीर केली जाईल असे कळवण्यात आले होते. गेल्या काही आठवड्यांमध्ये बारावीच्या परीक्षा देखील रद्द केल्या जाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, यामुळे प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर रमेश पोखरियाल निशंक यांनी आज (23 मे) रोजी भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांची, शिक्षण सचिवांची आणि राज्य परीक्षा बोर्डांच्या अध्यक्षांची बैठक बोलावली होती. ही बैठक पार पडली असून राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेबद्दल माध्यमांना माहिती दिली आहे.

ही बैठक सीबीएसईतर्फे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी, किंवा कशी घ्यावी याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही सहभाग घेतला. बैठकीत काही पर्यायांवर चर्चा झाली. या पर्यायांवर आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा बघूनचं यासंदर्भातील निर्णय व्हावेत, अशी मागणी केल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचं वर्तवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 14 लाख आहे.तर, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या 25 हजार आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना सुरक्षित वातावरणात केली पाहिजे. त्यामुळे, बारावीची परीक्षा महिनाभरानंतर राज्यातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा अशी मागणी केली, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या. दरम्यान, ट्विटरवर सध्या ‘CancleBoardExam’ म्हणजेच बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी ट्रेंडिंगला आली आहे. त्यामुळे, राज्य सरकार व केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!