Share

लसीकरणाची गती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवालांचे मोदींना चार सल्ले

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडून कोरोना प्रतिबंधक लसींचे पुरेसे डोस मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, या वेगाने केवळ प्रौढांच्या लसीकरणासाठीच ३० महिने लागतील, असा दावा केला दिला. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून चार सल्लेदेखील दिले आहेत.

राजधानी दिल्लीतील कोरोना परिस्थितीची मुख्यमंत्र्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. लसीच्या कमतरतेमुळे रविवारपासून दिल्लीतील १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण बंद करण्यात येत असल्याचे केजरीवालांनी सांगितले. मोदींना लिहिलेल्या पत्रातही त्यांनी याचा उल्लेख केला. मे महिन्यात दिल्लीला ८० लाख डोसची गरज असताना केवळ १६ लाख डोस मिळाले. जून महिन्यात फक्त ८ लाख डोस मिळणार आहेत. हे असेच चालले तर केवळ प्रौढांचे लसीकरण करण्यासाठी ३० महिने लागतील असे केजरीवाल म्हणाले

मुख्यमंत्री केजरीवाल यांचे सल्ले
केंद्राने देशातील सर्व लस उत्पादक कंपन्यांना भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या निर्मितीचे आदेश द्यावे
परदेशी लसींच्या वापराला सरकारने तत्काळ मंजुरी द्यावी
परदेशी लस उत्पादकांसोबत केंद्राने चर्चा करून लस खरेदी करावी आणि ती राज्यांना द्यावी
गरजेपेक्षा अधिक लसीचा साठा करणाऱ्या देशांकडून भारत सरकारने लस मिळवण्यासाठी प्रयत्न करावे
परदेशी कंपन्यांना भारतात लस उत्पादनाची परवानगी द्यावी

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!