Share

‘मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, उपमुख्यमंत्री पुण्याच्या बाहेर विचार करत नाहीत अन्…’

Published On: 

मुंबई : मागील काही दिवस राज्याचे कौशल्य विकास मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. तर, कोरोनाच्या दुसरी लाटेतील रुग्णसंख्या, भ्रष्टाचार, अपुरी आरोग्य व्यवस्था, ढिसाळ नियोजन, अपुरी मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा तीन तासांचा कोकण दौरा अशा मुद्द्यांवरून महाविकास आघाडीवर भाजपने हल्लाबोल केला आहे.

नवाब मलिक देखील भाजपला सडेतोड प्रत्युत्तर देत असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार यांना देखील लक्ष्य केलं आहे. दरम्यान, आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यासोबतच, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

‘ “असून खोळंबा, नसून वळिंबा” ही म्हण, महाविकास आघाडी सरकारला चपखल बसते. राज्याच्या हितासाठी ह्यांचा सत्तेत असून किंवा नसून पण काहीच उपयोग नाही! मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, उपमुख्यमंत्री पुण्याच्या बाहेर विचार करत नाहीत, अन् कौशल्य विकासमंत्री कामाचं सोडून सर्वकाही बडबडतात…,’ असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!