Share

‘वर्षा व मातोश्री ही दैवतांची घरे तर भ्रष्टाचाराचा महामेरू अशी राणेंची ओळख’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही महिन्यांपूर्वी राज्यात विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नेमणूकीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. आता हाच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आणि आणि माहिती अधिकारातून अशी १२ सदस्यांची कोणतीही यादी विधानभवनात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले होते.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी भुतांनी पळवलीये का ? असा सवाल शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. यासोबतच, महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. ही यादी राजभवनातच सुरक्षित असल्याचं वृत्त काही वाहिन्यांनी दिलं होतं.

आता भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी संजय राऊतांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. ‘राज्यात जर कुठे भुताटकी असेल तर ती मंत्रालय, वर्षा आणि मातोश्रीवर आहे. तेथे शांती करा. मन शांती करा, असं सांगतानाच राऊतांची भाषा ही योग्य नाही. राज्यकर्त्यांना शोभणारी ही भाषा नाही,’ असा सल्ला देखील नारायण राणे यांनी दिला आहे.

राणेंच्या या टीकेला आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. ‘भ्रष्टाचाराचा महामेरू अशी राणेंची ओळख आहे. भूखंड हडप करणारा म्हणजे नारायण राणे. त्यांचा अनुभव हा भ्रष्टाचारातून आलेला आहे. स्वत:च्या घरात त्यांनी शांती घालावी. वर्षा व मातोश्री ही दैवतांची घरे आहेत,’ असं सडेतोड भाष्य विनायक राऊत यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!