बीड : मराठा आरक्षण प्रश्नी ५ जून रोजी शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा विधानपरिषदेचे आमदार विनायक मेटे यांच्या पुढाकारातून मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येणारे. मात्र, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठकीत या आंदोलनाला विरोध करण्यात आला. शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत आ. मेटेंच्या भूमिकेवर आक्षेप घेतला गेला.
मराठा आरक्षणासह इतर प्रलंबित प्रश्नांवर आ. विनायक मेटे यांनी पुढाकार घेत ५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे नियोजन केले आहे. त्यासाठी त्यांनी पक्षीय व संघटनात्मक जोडे बाजूला ठेऊन समाजासाठी एकत्रित या, असे भावनिक आवाहन केले आहे. पण मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक झाली. यात सध्या कोरोनाचे थैमान आहे. अशा संकटात मोर्चा काढण्याऐवजी आधी कोरोनाला हरवू व नंतर आरक्षण मिळवू, असा सूर आळवण्यात आला. यावेळी आ.मेटे यांच्यासोबत गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनाही जाब विचारण्यात आला.
समन्वयकांनी अराजकीय भूमिका घेणे अपेक्षित आहे; परंतु काही जणांनी आ.मेटेंच्या सोयीचा निर्णय घेतला. मेटे यांच्या मोर्चाला विरोध नाही; परंतु मोर्चा काढण्याची ही वेळ नाही, असे मत समन्वयकांनी बैठकीत व्यक्त केले. यावेळी मोर्चात सहभागी होणाऱ्यांना विरोध नसल्याचेही जाहीर करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
परवानगी दिली नाही तरी मोर्चा काढणारच
प्रशासनाने परवानी दिली तर उत्तम नाही दिली तरीही हा मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे, अशी माहिती शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी बीडमधून ५ जून रोजी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात रविवारी बैठक पार पडली. प्रशासनाने परवानगी नाही दिली तरी देखील हा मोर्चा निघणार असल्याचे मेटेंनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कुणाच्या बापामध्ये मला अटक करण्याची हिंम्मत नाही-बाबा रामदेव
- होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप गावपुढाऱ्याच्या अंगलट, बीडमध्ये पोलिसांत तक्रार
- ‘बारा बलुतेदारांना आर्थिक मदत करावी’, ओबीसी काँग्रेसची मागणी
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

