Share

‘माझी वसुंधरा’ अभियानात वैजापूर नगरपरिषदेने मारली बाजी

Published On: 

वैजापूर : वैजापूर नगर परिषदेने माझी वसुंधरा २०२०-२१ या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यातील पहिल्या पाच नगरपरिषदांमध्ये तर औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या नंबर वर बाजी मारून एक कोटी रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. हा सन्मान सोहळा शनिवारी पर्यावरण दिनानिमित्त मंत्रालयाच्या ऑनलाइन बैठकीत पार पडला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, मुख्याधिकारी भागवत बिघोत यांना हे बक्षीस व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यातील २८८ ग्रामपंचायत १३० नगर पंचायत २२२ नगर परिषदा व ४३ अमृत शहरी यांचा सहभाग होता.

त्याअंतर्गत वृक्षारोपण, संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, वायू गुणवत्ता आणि अपारंपरिक ऊर्जा यावर आधारित तपासणी झाली. त्यानंतर तपासणीतून अंतिम क्षेत्रिय सर्वेक्षणासाठी पात्र नगरपालिका गटामध्ये वैजापूर नगरपालिकेने राज्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच नगरपरिषदांमध्ये स्थान मिळवले आहे.

वैजापूर नगर परिषदेच्या वतीने रिझॉलव्ह ट्रॅश टु क्रॅश या उपक्रमाच्या माध्यमातून कचऱ्याचे पृथक्करण केले जाते. रिसायकलिंग केले जाते. आणि हा कचरा पुनर्निर्मिती साठी कच्चामाल म्हणून वापरला जातो. पर्यावरणाच्या दृष्टीने या उपक्रमाचे दीर्घकालीन फायदे आहेतच. त्यासोबत शहरातील गोरगरिबांना विशेषतः महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यातही या उपक्रमाचा मोलाचा वाटा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!