औरंगाबाद : बेकायदेशीर रित्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील आघूर शिवारात शुक्रवारी दि.४ घडली. या प्रकरणी दोन ट्रॅक्टर चालकाविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आघूर शिवारात दोन ट्रॅक्टर वाळू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी या भागात जाऊन पाहणी केली. त्यावेळी दोन ट्रॅक्टर वाळू घेऊन जात असल्याचे दिसून आले. मात्र एक ट्रक्टर चालक पोलीसांना पाहून पळून गेला.
दोन्ही ट्रॅक्टर व त्यामध्ये भरलेली प्रत्येकी एक ब्रास वाळू असा एकुण ४ लाख १२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक रविकुमार किर्तीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक अनिल भास्कर जाधव रा.पुणतांबा व दुसरा अनोळखी या दोन जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक बोराडे हे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

