रायगड : येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे.
यावरून शिवसेना नेते आणि माजी मंत्री अरविंद सावंत यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार टोला लगावला आहे. छत्रपती संभाजीराजे भाजपचे खासदार आहेत. कोणाविरुद्ध लढतो? कशासाठी लढतोय? हे त्यांनी ठरवलं पाहिजे. सरकार तुमच्याबरोबर आहे. न्यायिक लढाई लढण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. कोणीतरी काढा दिल्यानंतर तुमचा आवाज विरोधात दिसत आहे, असा टोला सावंत यांनी लगावला आहे.
सावंतांच्या टीकेला खासदार संभाजीराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्राच्या जनतेला कोण वेठीस धरत आहे हे राज्यातील सगळ्या पुढाऱ्यांनाच विचारावे, छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला आहे आणि मी आजपर्यंत कोणाला वेठीस धरल नाही तो माझा रेकोर्ड आहे. विषय साधा आणि सरळ आहे आम्हाला न्याय मिळवून द्या. अरविंद सावंत याचं नाव मला घ्यायचं नाही ते फार हुशार आहेत, माजी मंत्री आहेत’. असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
दरम्यान, संभाजीराजेंचा आम्ही आदर करतो. भाजपचा या आंदोलनाला छुपा पाठिंबा असू शकतो. राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे हे आंदोलन केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय की सरकार विरोधात आहे? हे संभाजीराजेंनी स्पष्ट केलं पाहिजे, असं देखील सावंत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अवैध वाळू वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांनी केले जप्त
- मराठा असो वा कोणीही असो, संभाजीराजेंवरील टीका सहन करणार नाही; मराठा समन्वयकांचा इशारा
- स्पुतनिक लसीचा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मोठा साठा उपलब्ध होणार : आरोग्यमंत्री
- लसीकरणाला गती देण्यासाठी, औरंगाबादेत लस न घेता रस्त्यावर फिराल तर बसेल ५०० रुपयांचा दंंड!
- अडीच टक्के पॉझिटीव्हीटी रेट असलेला लातूर जिल्हा सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक


