औरंगाबाद : अडिच महिने बंद असलेली एसटी बससेवा २ जूनपासून सुरु करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसात एसटीला तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र सोमवारपासून कोरोनाचे नियम पाळून १०० टक्के बससेवा सुरु करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. रविवारी (दि.६) सकाळी मुख्य बसस्थानकातून पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, बुलढाणा यांसह १४ मार्गांवर तर सिडको बसस्थानकातून जालना, गंगापूर, अहमदपूर, हिंगोली यांसह ७ मार्गांवर बस धावल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली. तर उद्यापासून सर्वच मार्गांवर एसटी सेवा सुरु होत आहे.
एसटी महामंडळाची बस सेवा अत्यावश्यक सेवेत असली तरी कोरोनामुळे घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळले जात होते त्यामुळे एसटीला प्रवासी सेवा बंद करावी लागली. तब्बल अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर एक जून पासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी कामानिमित्त विविध ठिकाणी जाण्यासाठी आता एसटी बसकडे वळले आहे. त्यामुळे २ जून पासून एसटीने पुणे धुळे, जळगाव, नाशिक, जालना आदी मार्गांवर प्रवासी सेवा सुरु केली आहे.
पहिल्या दिवशी केवळ १४ ते १५ विविध मार्गांवर धावल्या. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी थोडा प्रतिसाद वाढल्याने २६ गाड्या सोडण्यात आल्या. सोमवारपासून शहरात शिथिल होणारे निर्बंध पाहता एसटी विभागाने देखील आता पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्ताच्या कडक निर्बंधांमध्येही औरंगाबाद एसटी विभागाचे २२ कोटींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी एसटीने तयारी सुरु केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अवैध वाळू वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांनी केले जप्त
- मराठा असो वा कोणीही असो, संभाजीराजेंवरील टीका सहन करणार नाही; मराठा समन्वयकांचा इशारा
- स्पुतनिक लसीचा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मोठा साठा उपलब्ध होणार : आरोग्यमंत्री
- लसीकरणाला गती देण्यासाठी, औरंगाबादेत लस न घेता रस्त्यावर फिराल तर बसेल ५०० रुपयांचा दंंड!
- अडीच टक्के पॉझिटीव्हीटी रेट असलेला लातूर जिल्हा सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

