औरंंगाबाद : जमीनीच्या वादातून सख्?या भावासह त्याच्या कुटूंबाला मारहाण करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आणखी एकाला मंगळवारी रात्री बेड्या ठोकल्या. अनिल हरिभाऊ चव्हाण (वय ३७, रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव असून त्याला ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी बुधवारी (दि.७) दिले.
साहेबराव बन्सी राठोड (वय ४४, रा. संतोषीमातानगर, मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादीला तीन भाऊ आहेत. त्यांच्यात वडीलोपार्जीत जमीनीवरुन वाद सुरु होते. २४ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उत्तम व त्याचे मेव्हणे अनिल चव्हाण, पोपट चव्हाण, प्रल्हाद राठोड, बबलु राठोड, अनिल राठोड, यशोदाबाई चव्हाण आणि सुनिताबाई राठोड हे फिर्यादीच्या घरी आले.
त्यांनी फिर्यादीसह त्यांची पत्नी, मुले व मेव्हणा पंडीत चव्हाण यांना शिवीगाळ करुन जबर मारहाण केली. प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज – नाना पटोले
- ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा राणेंनी काय प्रतिक्रिया दिली होती ते आठवावं’
- राणेंची मंत्रिपदी वर्णी लागल्याने शिवसेना-भाजपच्या युतीची शक्यता अधिक धूसर ? फडणवीस म्हणाले…
- काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा, हिजबुलचा टॉप कमांडर ठार
- विरोधकांवर भारी ठरला दानवेंचा ‘चकवा’, रेल्वे राज्यमंत्री पदी मिळवली बढती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

