नवी दिल्ली : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. मोदींच्या कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार होता. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला आहे. तर, दिग्गज मंत्र्यांकडून कार्यभार काढून घेत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि ऐतिहासिक घराण्याचा वारसा असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्च २०२० मध्ये भाजपात जात काँग्रेसला मोठा झटका दिला होता. शिंदेंनी भाजपमध्ये त्यांना मोठी जबाबदारी मिळणार होती हे निश्चित होतं. अखेर काल त्यांच्यावर थेट केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच शिंदे हे चर्चेत आले आहेत ते म्हणजे फेसबुकवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील व्हिडीओमुळे.
झालं असं की कोणी अज्ञात व्यक्तीने रात्री 12.23 वाजता शिंदेंच्या फेसबुक वॉलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील आक्रमक भाषण केलेला जुना व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ शिंदे काँग्रेसमध्ये असतानाचा आहे. आता त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हॅकर्सनी वेळ साधत त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंट वरून मोदींविरोधातील व्हिडीओ टाकला. रात्री 12.23 वाजता त्यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं. हॅकरने त्यांच्या वॉलवर जुने फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले. यामध्ये असे काही व्हिडीओ आहेत, ज्यात शिंदेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
त्यानंतर काही मिनिटातच हॅकिंग थांबविण्यात आलं, सोबतच अपलोड केलेला जुना व्हिडीओदेखील हटविण्यात आला. जेथून शिंदेचं फेसबुक अकाऊंट हॅक केलं होतं, त्याबाबतही माहिती मिळाल्याचं सांगितलं जात आहे. अजूनही सायबर टीम ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष ठेवून आहे.
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा, हिजबुलचा टॉप कमांडर ठार
- ‘पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने प्राधान्याने काम सुरु’
- ‘म्हणजे आता लसींचा तुटवडा भासणार नाही का?’, आरोग्यमंत्र्यांच्या बदलानंतर राहुल गांधींचा खोचक सवाल
- मंत्रिपद नाकारल्याने मुंडे भगिनी नाराज? ‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर भाजपने दिले स्पष्टीकरण
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी नाही, पण शरद पवारांनी फोन करून शुभेच्छा दिल्या’, मंत्री राणेंची माहिती


