नाशिक : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर ईडीने खडसेंना समन्स बजावत आज चौकशीसाठी बोलावलं. आज ते ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने ईडी, सीबीआयला कामाला लावलं आहे, अशी टीका महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. यासोबतच, एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाई ही राजकीय हेतूनेच असल्याचा आरोप देखील केला जात आहे. खडसेंच्या चौकशीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य करताना भाजपला लक्ष्य केलं आहे.
‘हा अभाव तंत्राचा भाग आहे. भाजपमधून बाहेर पडलं तर काय त्रास होतो हे दाखवायचंय. यासोबतच, इतर पक्षात असलेल्यांना त्रास देऊन तो आपल्या पक्षात आला की त्याचे सगळे गुन्हे माफ केले जातात. राजकारणात सध्या असे प्रयोग सुरु आहेत. मात्र, खडसे आणि आम्ही सगळे जण त्यांना निश्चितपणे उत्तर देऊ,’ असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी भाजपला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा, हिजबुलचा टॉप कमांडर ठार
- ‘पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने प्राधान्याने काम सुरु’
- ‘म्हणजे आता लसींचा तुटवडा भासणार नाही का?’, आरोग्यमंत्र्यांच्या बदलानंतर राहुल गांधींचा खोचक सवाल
- मंत्रिपद नाकारल्याने मुंडे भगिनी नाराज? ‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर भाजपने दिले स्पष्टीकरण
- ‘कायदा सर्वोच्च आहे, त्याचे पालन करावेच लागेल’, नुतन आयटी मंत्री वैष्णव यांनी ट्विटरला झापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

