Share

Amol Kolhe | वढू-तुळापूर संभाजी महाराज स्मारक विकास निधीवर स्थगिती ; अमोल कोल्हेंचा शिंदे सरकारला प्रश्न

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या कामांना अनेक कामांना तसेच निर्णयांना स्थगिती दिली. त्यामुळे विरोधक शिंदे सरकारवर टीका करत आहेत. काल (गुरुवार) देखील शिंदे सरकारने महाविकास आघाडीला दणका दिला आहे. सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनांच्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला असून, या निर्णयामुळे आता सामाजिक न्याय विभागाच्या ६०० कोटी रुपयांच्या कल्याणकारी योजनांना स्थगिती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठीच्या निधीवर स्थगिती दिल्यामुळे प्रश्न उपस्थित केले आहेत.

अमोल कोल्हे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी आपण निधी मंजूर करून आणला होता. परंतु त्याला आता स्थगिती देण्यात आल्याची बातमी कानावर आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात असे काही घडू शकते, यावर माझा विश्वासच बसत नाहीये.”

https://www.facebook.com/Dr.AmolKolhe/posts/pfbid0xLtUQk1zYPVfn6kbJ2L66BfTfWUxVemTEgLJiUJAPtASD2HuzKJADKdPZvUy8D8yl

“छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर, आत्मियता आणि अभिमान नाही असा माणूस महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. याला कोणताही पक्ष, कोणतीही विचारसरणी, कार्यकर्ता किंवा नेता अपवाद असूच शकत नाही. त्यामुळे सदर स्थगिती स्मारकाच्या विकास कामात काही विधायक बदल करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी आणलेली असू शकते, असे एक शंभूभक्त म्हणून मला वाटतेय. तसेच असेल असा विश्वास मनात ठेवून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना माझी कळकळीची विनंती आहे की, आपण स्थगितीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा,” अशी मागणी खासदार आमोल कोल्हे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!