औरंगाबाद : ५ एप्रिलपासून महानगरपालिकेने शहरात जम्बो लसीकरण मोहीम सुरू केली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. यासाठी लसीकरणात ५ लाखांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी ठेवले आहे. जेव्हा शहरातील एकुण लोकसंख्येच्या ३० ते ४० टक्के लसीकरण होईल त्यावेळी शहर सुरक्षिततेच्या मार्गावर असेल असे प्रशासनाचे मत आहे. मात्र सध्या शहरात लसींचा ठणठणाट आहे. आज (दि.२४) शहरात केवळ आठ ठिकाणी लसीकरण होणार आहे. महापालिका प्रशासन आता लसींच्या प्रतिक्षेत आहे.
मनपा प्रशासनाने जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या शहरातील ११५ वॉर्डात १५५ केंद्र व इतर सहा केंद्रावर दररोज सरासरी सहा ते सात हजार जणांना लसीकरण केले जात आहे. मात्र आता लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे यातील केवळ ८ केंद्र आज सुरु असतील. लसींच्या पुरवठ्यानंतर उर्वरित केंद्र पुन्हा सुरु केले जातील.
महापालिकेने दीड लाखांचा लसीकरणाचा टप्पा आत्तापर्यंत पार केला आहे. व्यापारी, कर्मचारी, कामगार वर्गाचेही लसीकरण सुरू झाले आहे. मात्र तीन दिवसांपूर्वी १ लाख लसींची मागणी केल्यानंतर केवळ १२ ते १५ हजार लसींचा साठा प्राप्त झाला होता. त्यामुळे मनपाने एक लाख कोविशिल्ड व ५० हजार कोव्हॅक्सीन लस पुरवण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सोमवार पर्यंत लसी मिळण्याची अपेक्षा
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण व मास्क वापरणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे पालिकेने सुरुवातीपासून लसीकरण मोहिम प्रभावीपणे सुरू केली आहे. आज ८ लसीकरण केंद्र सुरु असतील. लसींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यावर लसीकरण मोहीम पूर्वरत सुरू होईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन आपली गैरसोय टाळावी व मनपा प्रशासनास सहकार्य करावे. आपण दिड लाख लसींची मागणी केली आहे. सोमवार पर्यंत हा साठा येण्याची शक्यता आहे. त्यानंतर लसीकरण सुरळीतपणे सुरु होईल.
– डॉ. नीता पाडळकर, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत मोकाट फिरणाऱ्या ९० जणांची तपासणी; ४ जण कोरोना बाधीत
- राधेचा ट्रेलर पाहुन टायगर झाला दिशा पाटनीवर फिदा; इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत केले कौतुक
- देशातील ऑक्सिजन संकट निवारण्यासाठी हवाई दल इन ऍक्शन; सिंगापूरहून आणणार मदत
- माधुरी देत आहे मास्क लावण्याचे धडे : पहा व्हिडीओ
- माझी बांधिलकी सरकारशी नाही राज्यातील जनतेशी, ट्रोलरला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

