Share

राधेचा ट्रेलर पाहुन टायगर झाला दिशा पाटनीवर फिदा; इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत केले कौतुक

Published On: 

मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षीत राधे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरवर चाहत्याचा लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे. सलमान खान सोबत दिशा पाटनी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. हा ट्रेलर बघीतल्यानंतर तिचा कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफनेही तिचे कौतुक केले आहे.

राधेचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर टायगर श्रॉफने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटातील काही फोटो शेअर केले. यात टायगरचे वडील जॅकी श्रॉफ, कथित गर्लफ्रेंड दिशा पाटनी आणि चित्रपटातील मुख्य अभिनेता सलमान खानचंही कौतुक केलं आहे. टायगरनं वडील जॅकी श्रॉफ यांच्या फोटोला ‘आजही तुम्ही हॅन्डसम हिरो आहात.’ असे कॅप्शन दिले. तर दिशा पाटनीचा एक ग्लॅमरस फोटो शेअर करत लिहिलं, ‘दिशा खूपच सुंदर ‘. तर शेवटी सलमान खानच्या फोटोला अभिनंदन म्हणत चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘राधे’च्या धमाकेदार अॅक्शन ट्रेलरमध्ये सलमान खान आणि रणदीप हुड्डा यांच्यात दमदार टक्कर पाहायला मिळलं आहे. ट्रेलरमध्ये सलमानची दमदार एंट्री, धमाकेदार डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात सलमान खानसोबत रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवानं केलं असून हा चित्रपट येत्या १३ मे ला थिएटरसोबतच Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही रिलीज होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!