उस्मानाबाद: कोरोनाचा कहर वाढत असल्याने जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. तरी सुद्धा विनाकारण फिरणाऱ्या ५० नागरिकांची उमरगा येथे शुक्रवारी रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये दोन नागरिक पॉझिटीव आढळून आले. तसेच मुरूम येथील पथकाने यामध्ये दोन नागरीक पॉझीटीव आढळून आले. तर मुरुम येथे ४० लोकांच्या तपासणी दोन बाधी असल्याचे समोर आले आहे.
उमरगा शहरात नागरिक मोठ्या संख्येने विनाकारण फिरत आहेत. संचारबंदीचा आढावा घेण्यासाठी आ. ज्ञानराज चौगुले यांनी शहरात पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठलराव उदमले, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार संजय पवार, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, उमरगा बाजार समितीचे सभापती एम. ए. सुलतान उपस्थित होते. यावेळी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चाप बसावा यासाठी रॅपिड टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आला.
महसूल, पोलिस, नगरपालिका व आरोग्य विभागाच्यावतीने ही कार्यवाही सुरू करण्यात आली. शुक्रवारी शहरातील मोकाट फिरणाऱ्यांची जागेवरच टेस्ट करण्यात आली. काही बेशिस्तांवर यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी ५० नागरीकांची कोरोना चाचणी करण्यात आली यापैकी दोघे करोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर मुरुम येथे संचारबंदीच्या काळात मोकाट फिरणाऱ्या ४० नागरीकांची टेस्ट केल्यानंतर दोघे पॉझीटीव आढळून आले.
महत्वाच्या बातम्या
- ‘या महामारीच्या काळात आपण सगळे सोबत आहोत’ ; शोएब अख्तरने भारतीयांसाठी मागितली अल्लाहकडे दुवा
- संबंधित रूग्णालयांना रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावे लागणार; जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आदेश
- सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे केंद्राची पाठराखण, काँग्रेसचा आरोप
- ‘तुमच्या अनेक चुका आहेत…’ कंगना रनौतने केजरीवाल यांना सुनावले
- पाच स्पर्धेतील अपयशाचे ओझे घेऊन जगणाऱ्या सचिनचे विश्वचषकाचे स्वप्न २०११ मध्ये झाले पु्र्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

