Share

माझी बांधिलकी सरकारशी नाही राज्यातील जनतेशी, ट्रोलरला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सोशल मीडियावर ट्रोलरला थांबवणे कोणालाही शक्य नाही. कोणत्या कारणामुळे एखादी व्यक्ती ट्रोल होईल, हे देेखील सांगता येत नाही. वर्ष २०१४ ते २०१९ दरम्यान सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टवर २०२१ मध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांना ट्रोल करण्यात येतय. अशा ट्रोलरला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या वेळी जे माझा उदो-उदो करत होती, तीच मंडळी आता ट्रोल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘२०१४ ते १९ मध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणांवर मी Twitter वर व्यक्त झाल्यावर उदोउदो करणारी मंडळी आता का बरं नाराज होत असावी. सरकार कुणाचही असू देतं लोकांना होणाऱ्या त्रासावर मी व्यक्त होतंचं रहाणार, कुणी कितीही ट्रोल केलं तरीही. माझी बांधिलकी सरकारशी नाही राज्यातील जनतेशी आहे.’

वास्तविक २०१४ ते २०१९ दरम्यान राज्यात फडणवीस सरकार होते. त्या वेळी चित्रा वाघ विरोधी पक्षात होत्या. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या आधीच्या काळात त्यांनी फडणवीस सरकारवर अनेक वेळा टीका केली आहे. याच काळात केलेल्या टीकेवर आता नेटकरी वाघ यांना ट्रोल करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!