जालना: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग जस जसा वाढत आहे. तसतसी कोवीड प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे, त्यात आरोग्य विभागाकडील लसीचा साठा संपला असून, सध्या जिल्ह्यात लसीचा एकही डोस शिल्लक नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्याला एका आठवड्याला सुमारे पावणेदोन लाख लसींची गरज असून, तशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत उपलब्ध होणाऱ्या लसीचे डोस खूपच कमी असल्याने अनेक केंद्रांवर लाभार्थ्यांना रांगेतून लस न घेताच माघारी फिरावे लागत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत लसीचे एक लाख ८५ हजार ७१९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात दररोज लसीकरण सुरू ठेवण्यासाठी दिवसाला २५ हजार तर आठवड्याला लसीच्या सुमारे पावणेदोन लाख डोसची गरज आहे. तशी मागणीही आरोग्य विभागाने शासनाकडे नोंदवली आहे. मात्र, असे. असतानाही मागील आठवड्यात कोव्हिशिल्डचे केवळ १२ हजार ९०० तर कोव्हॅक्सिनचे ११ हजार डोस उपलब्ध झाले. सध्या कोविशिल्डचा एकही डोस आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही.
तर कोव्हॅक्सिन लसीच्याबाबतीत अशीच स्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. येत्या एक मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाचे लसीकरण करण्यात येणार असल्याने लसींचा आणखीच तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या १ मे पासून राज्यात १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला कोवीड प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पोलिसांनी केला हस्तगत
- भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नव्या कोविड सेंटर्सचा प्रारंभ
- आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांनी लस पैसे देऊन घ्यावी – सचिन खरात
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- ऑक्सिजन प्लांटच्या कामासाठी एका नव्या पैशाचाही निधी मिळाला नाही त्यात भ्रष्टाचार कसा झाला?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

