Share

औरंगाबादेत लसींचा तुटवडा कायम, पालिका तिसरी लाट रोखणार कशी?

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेला सोमवारी (दि.१२) कोविशिल्ड लसींचा साठा मिळाला नसल्याने लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. मात्र संध्याकाळपर्यंत लसींचा साठा येण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे मंगळवारपासून (दि.१३) लसीकरण सुरळीत सुरू होईल. मात्र मिळणारा साठा अत्यल्प असून हा एका दिवसातच संपत आहे. त्यामुळे तिसरी लाट रोखणार कशी? हाच प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महापालिकेने जोरदार तयारी केली होती. जोपर्यंत लसींचा साठा उपलब्ध होता तोपर्यंत महापालिकेने एका दिवसात तब्बल पंधरा ते सोळा हजारांपर्यंत लसींचे डोस दिले. सद्यपरिस्थितीत दुसऱ्या डोससाठी नागरिकांची वेटिंग वाढली असून तब्बल पन्नास हजार जण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे लस प्राप्त होताच केवळ दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांनाच प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांकडून लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र वारंवार लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास होत आहे. गेल्या १५ दिवसात केवळ चार ते पाचच दिवस लसीकरण सुरु होते. आत्तापर्यंत १५, १२, १० हजार अनुक्रमे लसींचा पुरवठा झाला. मात्र लस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने एकाच दिवसात हा साठा संपत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!