औरंगाबाद : गेल्या दिड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय जवळपास बंदच आहे. ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु आहे. मात्र यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र सरासरी गुणांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचे टेन्शन नाही तर परिक्षेनंतर लागणाऱ्या निकालाची हुरहूर देखील नसल्याचे चित्र दिसून येत आहे. एकुणच परिक्षेविना पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लवकरच संगणकीय चुकांच्या दुरुस्तीनंतर निकाल लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल संगणकीय प्रणालीवर शाळांकडून भरून घेत आहे. परंतु, शाळांनी निकाल भरताना अक्षम्य चुका करून ठेवल्या आहे. या चुका दुरूस्त करण्यास वेळ लागत असल्याने औरंगाबाद विभागीय मंडळाने बोर्डाकडे मुदतवाढ वाढून देण्याची मागणी केली आहे, अशी माहिती औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दहावीच्या परिक्षा रद्द केल्या आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा नववी आणि दहावी वर्गांच्या अतंर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तिर्ण करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंञी वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. माञ, हा निकाल ठरलेल्या कालावधीत लागेल, याची शक्यता कमीच आहे.
कारण शाळांनी विद्यार्थ्यांचा निकाल भरताना अनेक चुका करून ठेवल्या आहेत. या चुकाच विद्यार्थ्यांच्या निकालाला अडसर ठरत आहे. या चुका किचकट असल्याने औरंगाबाद विभागीय मंडळाने बोर्डाकडे निकाल पूर्ण करण्यासाठी आणखी एकदा मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे, अशी माहिती मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संजय राऊत रॉकस्टार’; उर्मिला मातोंडकर यांनी केलं कौतुक
- ‘योगी सरकारमधील मंत्र्यांना किती मुले ते आधी सांगा’ ; काँग्रेस नेत्याची टीका
- कोरोना इफेक्ट! कंत्राटी क्रिडा शिक्षकांपुढील आर्थिक संकट दूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ‘पेट्रोल, डिझेलचे दर वाढले असले तरी…’ सुजय विखेंचा अजब युक्तिवाद वाचून डोक्याला हात लावाल !
- मनोज ठवकर प्रकरणाशी संबंधित पोलिसांचे निलंबन करा; फडणवीसांची मागणी


