पुणे : गेल्या वर्षी अभिनेत्या उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षातून राजकीय वाटचाल सुरु केल्यानंतर त्यांनी काही महिन्यांतच काँग्रेसला रामराम ठोकला होता. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मातोंडकर यांची राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी केल्याचं समोर आलं होतं. अद्याप राज्यपाल नियुक्त आमदारांचे प्रकरण प्रलंबित आहे.
दरम्यान, शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर या आता शिवसंपर्क अभियानाच्या कारणाने सक्रिय झाल्या असून आज पुण्यातील अभियानामध्ये त्या सामील झाल्या होत्या. आजपासून (१२ जुलै) सुरु झालेलं शिवसंपर्क अभियान हे २४ जुलैपर्यंत राज्यभरात राबवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधून राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासह सामना अग्रलेखावर भाजपसह काँग्रेस नेते देखील काही टीका करत असल्याचे दिसून आले आहे. टीकाकारांना मातोंडकर यांनी चोख उत्तर दिलंय.
‘खासदार संजय राऊत अनेक लोकांच्या टीका सहन करून चोरावर मोर होण्यात सक्षम आहेत, त्यामध्ये मी काय बोलू. ही इज रॉकस्टार !,’ अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांचं कौतुक केलंय. यासोबतच, ‘शिवसेनेत नसलेल्या आणि सामना दैनिकाबद्दल फारशी माहिती नसलेल्यांनी याबद्दल फारसं बोलू नये,’ असं देखील मातोंडकर म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामान्यांना लोकलप्रवासाची मुभा द्या नाहीतर पाच हजार प्रवास भत्ता द्या’; भाजपची मागणी
- आता गडकरीही म्हणाले, ‘इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांमध्ये संताप’; सुचवला ‘हा’ पर्याय
- संभाव्य तिसऱ्या लाटेत उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार सुरू राहावे यासाठी प्रयत्न करा – उद्धव ठाकरे
- ‘मोदींनी अवघ्या ७ वर्षात देशातील जनतेचे जगणे मुश्कील करुन ठेवले’
- संभाजीराजेंची गादी श्रेष्ठ, त्यांनी भाजपच्या खासदारीला लाथ मारायला हवी- हर्षवर्धन जाधव


