लातूर: राज्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सीजन तसेच कोरोना वरील उपयुक्त अशा लासीचा तुटवडा जाणवत आहे. याचा लातूर जिल्ह्याला मोठा फटका बसत आहे. शनिवार पासून येथे लसीकरण बंद झाले आहे. महानगरपालिकेकडील लसी संपल्यामुळे रविवारीही लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आले आहेत. सुरुवातीला लातूर जिल्ह्याने लसीकरणाची चांगली मोहीम राबवत ५० हजार लातूरकरांना ‘लसवंत’ केले, मात्र आता मोहीम पूर्णतः बंद झाली आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईतील अत्यंत महत्त्वाचे शस्त्र असणारी लस शहरातील प्रत्येक नागरिकाला मिळावी, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. त्यामुळे मनपाच्या वतीने शहरात ९ ठिकाणी मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आजपर्यंत हजारो नागरिकांनी त्याचा लाभ घेतला असून मनपा क्षेत्रात लसीकरणाचा ५० हजारांचा टप्पा पूर्ण झालेला आहे.
सध्या कोरोनावरील लसींचा मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मनपालाही लस मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने लसीकरण मोहीम थांबवण्यात आलेली आहे. रविवार दि.२५ एप्रिल रोजीही लस नसल्यामुळे लसीकरण बंद राहणार आहे. त्यामुळे लस घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी रविवारी लसीकरण केंद्रावर येऊ नये. लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना सूचित करण्यात येईल व लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अखेर प्रशासनाला आली जाग, निलंग्यात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था
- दुर्घटनांमध्ये अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी राजेश टोपेंची इच्छा आहे का ? भाजप नेत्याचा संतप्त सवाल
- कोरोनाबाधित गर्भवती पत्नीसाठी पतीने केले अॅम्बुलन्सचे अपहरण !
- मोदी सरकारवर टीका करणारे नेते, अभिनेत्यांचे ट्विट्स ब्लॉक
- घराबाहेर पडाल तर कारवाईला सामोरे जाल; लातूरात कडक निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

