लातूर: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने चिंतेत भर पडत आहे. त्याच सोबत वैद्यकीय सुविधांची कमतरता देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ बघून सध्या येथील प्रशासन सुद्धा हतबल झाल्याचे बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव जल असल्याने येथील रुग्णालयांमध्ये देखील ऑक्सीजन बेड्सची कमतरता भासू लागली. अखेर वाढती रुग्णांची संख्या पाहता येथे ऑक्सीजन बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
निलंगा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने व त्यातील बहुतांश रुग्णांना ऑक्सिजन लागत असल्याने प्रशासनाने पावले उचल ४० ऑक्सिजन बेडची संख्या वाढत ती ७३ केली असून निलंगा शहरातील श्वास रुग्णालयात १९ बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. निलंगा तालुक्यातील ते पहिले खाजगी कोविड सेंटर ठरले.
निलंगा शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मागच्या दिड महिन्यापासून झपाट्याने वाढत असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजारांच्या वर गेली आहे. त्यातील अनेक रुग्णांनी दुखणे अंगावर काढत गंभीर अवस्थेत असताना शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना थेट ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात येत असल्याने ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत.
सदरील बाब तहसीलदार गणेश जाधव यांनी गांभीर्याने घेत गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या समवेत वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिलीप सौंदाळे यांची बैठक घेऊन ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु करत शहरातील श्वास हॉस्पिटलचा कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठवुन तो तात्काळ मंजूर करून घेत १९ ऑक्सिजन बेड ची परवानगी मिळवली. उपजिल्हा रुग्णालय डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये ५० ऑक्सिजन बेड व ५० नॉन ऑक्सिजन बेड असे १०० बेड व आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून कासारशिरसी प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ ऑक्सिजन बेड, अशी तालुक्यासाठी एकूण ७३ ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आल्याने आता तालुक्यातील रुग्णांना बेडच्या शोधात जिल्ह्याच्या ठिकाणी फिरावे लागणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- दुर्घटनांमध्ये अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी राजेश टोपेंची इच्छा आहे का ? भाजप नेत्याचा संतप्त सवाल
- कोरोनाबाधित गर्भवती पत्नीसाठी पतीने केले अॅम्बुलन्सचे अपहरण !
- मोदी सरकारवर टीका करणारे नेते, अभिनेत्यांचे ट्विट्स ब्लॉक
- घराबाहेर पडाल तर कारवाईला सामोरे जाल; लातूरात कडक निर्बंध
- परभणीमधील खासगी कोविड सेंटर्सला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध


