औरंगाबाद : महापालिकेने जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. शासन आदेशानुसार एक मे पासून १८ ते ४० वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण सुरू झाले आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे ४५ च्या पुढील नागरिकांचे लसीकरण थांबवण्यात आले होते. काल १२ हजार लसी जिल्ह्याला मिळाल्या यातील ६ हजार मनपाच्या वाट्याला आल्या आहेत. यातून आज १८ प्लस आणि ४५ च्या पुढील नागरिक ज्यांचे दुसरे डोस बाकी आहेत अशांचेच आज लसीकरण होणार आहे.
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे महापालिकेने ४५ च्या पुढील, तसेच १८ प्लस नागरिकांची लसीकरण मोहिम सुरु केली आहे. केंद्र सरकारकडून ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी मोफत लस पुरविण्यात येत असली तरी लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे वारंवार लसीकरणामध्ये अडथळा निर्माण होत आहे. पालिकेने दर आठवडयाला एक लाख लसींची मागणी केलेली आहे. मात्र सरकारकडून केवळ २५ ते ३० हजार लस पुरवली जात आहे.
मागील आठवडयात पालिकेला २५ हजार लस मिळाली होती. ही लस दोन दिवसात संपली. त्यामुळे शुक्रवारपासून लसीकरण बंद आहे. लस कधी मिळणार याची माहिती नसल्याने नागरिकांनी केंद्रावर येऊ नये, असे आवाहन देखील केले आहे. चार दिवस उलटून गेल्यावर राज्याच्या आरोग्य विभागाकडून औरंगाबाद सर्कलसाठी मंगळवारी (दि.४) रोजी १२ हजार लसींचा पुरवठा करण्यात आला.
दुसरा डोस असलेल्या नागरिकांसाठीच मिळालेली सहा हजार लस वापरली जाणार आहे. मागील चार दिवसांत राहिलेल्या तसेच ज्या नागरिकांना दुसरा डोस घ्यावयाचा आहे, अशांनीच बुधवारी (दि.५) पालिका आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी यावे. तसेच सरकारकडून लसींचा मुबलक पुरवठा झाल्यानंतरच 15 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल. तोवर त्यांनी लस घेण्यासाठी केंद्रांवर येऊ नये, असेही आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे सोपवा; सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा आहेर
- राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर नव्हते – आमदार लोणीकर
- महाभकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजावर अन्याय – सुभाष देशमुख
- रास्ता रोको करणाऱ्या साष्टपिंपळगावच्या मराठा आंदोलकांना अटक, गावात तणावाचे वातावरण!
- आता फेसबुक, नेटफ्लिक्स, गुगलसारख्या कंपन्यांना डिजिटल कर भरावा लागणार


