🕒 1 min read
जालना : मराठा समाजाची बाजू न्यायालयात नीट मांडली गेली नाही, तसेच त्या संदर्भातले भक्कम पुरावे सादर करता आले नसल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. राज्य सरकारने बाजू नीट मांडली असती तर आरक्षण टिकले असते, असा आरोप माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या निकालावर प्रतिक्रीया देताना ते बोलत होते.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी प्रामणिक प्रयत्न केले होते. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम झाले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात वारंवार वकील अनुपस्थित राहणे, कारण नसताना तारखा वाढवून मागणे अशा अनेक चूका झाल्या. त्याचा परिणाम झाल्यानेच आरक्षण टीकले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
@Dev_Fadnavis यांनी High Court मध्ये मिळवलेले १२% व १३% मराठा आरक्षण उद्धव ठाकरेंच्या MVA सरकारने Supreme Court मध्ये घालवले.@BJP4Maharashtra#MarathaReservation pic.twitter.com/mddlxafOer
— Babanrao Lonikar (@BabanraoLonikar) May 5, 2021
मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष दिल्याने मराठा समाजाचे आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकार आधीपासूनच या विषयात गंभीर नव्हते. त्यामुळे मराठा आरक्षणाला ठाकरे सरकार जबाबदार असून हे सरकारचे अपयश असल्याचा आरोपही लोणीकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजातील सरदारांमुळेच मराठा समाज आजपर्यंत आरक्षणापासून वंचित – सदाभाऊ खोत
- ‘पत्रकार परिषदेत ढळढळीत खोटं बोलल्याने मराठा समाज तुम्हाला माफ करेल असे समजू नका’
- ‘निलंग्यातील तहसीलदारांना निलंबित करा’, कोरोना मृत्यूवरून सर्वपक्षीय नेते आक्रमक
- महत्त्वाचा निर्णय! राज्य सरकारचे नवीन ‘पोषण कार्ड’, स्थलांतरित मातांसह अपत्यांना फायदा
- औरंगाबादेत लवकरच हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट, आदित्य ठाकरेंचा पुढाकार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

