Share

कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे सोपवा; सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा आहेर

Published On: 

दिल्ली : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

बाहेरील देशांकडून आता मदत येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या उपाययोजनांवर प्रश्न चिन्ह निर्माण करत कोरोना स्थिती हाताळण्यात अपयश आल्याचे ताशेरे ओढले आहेत. अशातच आता भाजप नेते व खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी अशी मागणी केली आहे.

कोरोना काळात गडकरींनी महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात येण्यासाठी तसेच ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्सचा तुटवडा कमी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख असलेल्या नितीन गडकरी यांच्याकडेच कोरोना लढ्याची सूत्रे सोपवली जावीत अशी मागणी याआधी देखील केली गेली होती.

आता, सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. ‘भारताने मुस्लीम आक्रमण आणि ब्रिटीश साम्राज्यशाहीचे संकट ज्याप्रमाणे परतावून लावले तसेच कोरोनाच्या संकटानंतरही भारत तग धरून राहील. नियमांचे पालन न केल्यास भारताला कदाचित कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे सोपवायला हवीत. पंतप्रधान कार्यालयावर विसंबून राहणे, हे निरुपयोगी ठरेल,’ असा सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!