Share

‘लसीकरण चार दिवस बंद तरी रेकॉर्ड केल्याचा दावा ; हा तर पोरखेळ’

Published On: 

मुंबई : राज्यात १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. गेल्या तीन महिन्यात लसीकरण मोहिमेमध्ये देशात महाराष्ट्राची कामगिरी विक्रमी राहीली आहे. परंतु सध्या मुंबईमध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईत कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण बंद होते. तर आता काही तुरळक प्रमाणात आता लसीकर सुरु झाले.

लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. चार दिवस लसीकरण बंद ठेवायचं. त्यानंतर लसीकरण करून रेकॉर्ड निर्माण केल्याचा दावा करायचा हा निव्वळ पोरखेळ आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर केली आहे. आज ते एका वृत्त वाहिनीशी बोलताना हे टीकास्त्र डागले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘मोदींना रेकॉर्ड करायची, इव्हेंट करायची आणि प्रसिद्धीची हौस आहे. आता त्यांनी लसीकरणाचा रेकॉर्ड केल्याचा दावा केला आहे. तीन चार दिवस लसीकरण थांबवायचं. नंतर एकाच दिवशी लसीकरण करून रेकॉर्ड केल्याचा दावा करायचा हा पोरखेळ आहे. लोकांच्या जीवाशी हा खेळ आहे, देशात डिसेंबरपर्यंत लसीकरण करायचे असेल तर 200 कोटी डोस लागणार आहेत. पण सरकारची तशी तयारी दिसत नाही,’ असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!