मुंबई –शरद पवारसाहेबांनी काल भाष्य केल्यानंतर ‘चोर के दाढीमे तिनका’ असं वक्तव्य भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार यांनी केलं मात्र त्यांनी ‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नांव काय हे आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत लगावला आहे.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी भाजपला निशाण्यावर घेत जोरदार फटकेबाजी केली. योगी आदित्यनाथ यांची ‘दोन मुलांची’ पॉलिसी असेल किंवा अमित शहा यांच्या सहकार खात्याबद्दल भाजपकडून देण्यात येत असलेल्या धमक्या असतील आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही नवाब मलिक यांनी भाष्य करत सबुरीचा सल्ला दिला.
पवारसाहेबांनी २०१३ साली युपीए सरकारच्या काळात सहकाराला घटनात्मक सुचित टाकून स्वायत्तता देण्याचे काम केले. परंतु या स्वायत्ततेवर कोण गदा आणत असेल तर त्यावर नंतर बोलू मात्र कायद्याचं राज्य असतं. कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. एखादा व्यक्ती मंत्री झाला म्हणून सर्व अधिकार मिळतात असं नाही. त्यामुळे भाजपच्या लोकांनी जबाबदारीने बोलावं असा इशाराही नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांना यावेळी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ, ईडीकडून चौकशी सत्र सुरूच
- नाराज समर्थकांसोबत महत्त्वाची बैठक, पंकजा मुंडे काय निर्णय घेणार?
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेचे पटोलेंना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

