Share

शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी; देशभरात शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार

Published On: 

नवी दिल्ली- देशभरात सध्या लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. या पार्श्वभूमीवरकेंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांची बैठक आज नवी दिल्ली इथं झाली. देशभरातल्या शिक्षकांचं लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन कोटी अतिरिक्त लसी देणार आहे असं जाहीर करण्यात आले आहे.

राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी शिक्षणासंबंधीच्या माहितीसाठीच्या एकत्रित जिल्हा माहिती यंत्रणेचा वापर करावा आणि राज्यांचे शिक्षण विभाग, केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय संघटनांशी समन्वय साधावा, जेणेकरून या लसीकरण कार्यक्रमाला वेग येईल असं भूषण यावेळी म्हणाले.

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत भारतानं 60 कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल संध्याकाळी ही माहिती दिली. देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 37 हजार 593 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 34 हजार 169 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

या कालावधीत कोविड-19 मुळे 648 जणांच्या मृत्युंची नोंद झाली. उपचाराखालील कोरोना रुग्णांमध्ये 2 हजार 776 नं वाढ झाली. सध्या देशात 3 लाख 22 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांचं प्रमाण अद्याप 1 टक्क्याच्या खाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण 97 पूर्णांक 67 शतांश टक्के आहे. कोविड-19 मुळे देशात आजवर दगावलेल्यांची संख्या 4 लाख 35 हजारांहून अधिक झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!