Share

पाच दिवसात ६० हजार औरंगाबादकरांचे लसीकरण, शहरात ४ लाखांचा टप्पा पूर्ण!

Published On: 

औरंगाबाद : २२ जून पासून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी मंदावलेल्या लसीकरणाला आता गती मिळताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसात सुमारे सात हजार जणांचे लसीकरण महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. दररोज सरासरी १४ ते १५ हजार जणांना दिली जात आहे. त्यामुळे आता शहरातील लसीकरणाचा चार लाखांचा टप्पा पूर्ण झाला असून येत्या काळात ही संख्या अजून वाढणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे २१ जूनपासून लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र राज्य सरकारने लसींची उपलब्धता विचारात घेऊन ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले होते. त्यानंतर लसींची संख्या वाढल्याने राज्य शासनाने नव्याने आदेश काढत २२ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु केले आहे. यात पहिल्याच दिवशी (दि.२३) १२ हजार २३० जणांचे लसीकरण झाले तर दुसऱ्या दिवशी १४ हजार ६७ जणांनी लस घेतली. लसीकरण केंद्रांवर पहाटे पासूनच रांगा लागत आहेत.

गेल्या पाच दिवसात ६० हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सुरुवातीला लसींची उपलब्धता नसल्याने लसीकरणाची संख्या कमी होती. त्यानंतर मात्र दुसरी लाट ओसरली आणि नागरिकांची लसीकरण करून घेण्याची इच्छा देखील नाहिशी झाली. मनपाकडे ५० हजार लसी उपलब्ध असतानाही लसीकरणाची गती मंदावली होती. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाल्याने औरंगाबादेत लसीकरणाची गती वाढत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!