Share

कश्यप परुळेकर दिसणार नेताजी पालकरांच्या भूमिकेत

Published On: 

मुंबई : स्टार प्रवाह लवकरच प्रेक्षकांनासाठी एक नवी ऐतिहासिक मालिका घेऊन येणार आहेत.  २६ जुलैपासून रात्री १० वाजता ‘जय भवानी जय शिवाजी’ हि मालिका सुरू होणार असून  स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे.

विशेष म्हणजे या मालिकेत लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका  साकारणार आहेत. तसेच या मालिकेत नेताजी पालकरांची भूमिका अभिनेता कश्यप परुळेकर साकारणारा आहे. या मालिकेत कश्यप एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मालिकेविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

https://www.instagram.com/tv/CNcRkELpFCa/?utm_source=ig_web_copy_link

या मालिकेविषयी सांगतान कश्यप म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेपासून सुरु झालेला हा प्रवास अविरत सुरुच आहे. या मालिकेसाठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा मी लगेच होकार दिल शिवरायांच्या शिलेदारांची गोष्ट मालिकेतून भेटीला येणार आहे. त्यामुळे नेतोजी पालकर साकारणं माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे. या शूरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे ‘असं कश्यप म्हणाला.

या आधीदेखील कश्यपने एका ऐतिहासिक सिनेमात काम केलं आहे. त्यामुळे तलवारबाजी आणि घोडेस्वारी याचं प्रशिक्षण त्याने आधीच घेतलं होतं. पुढे तो म्हणाला, ‘या भूमिकेसाठी मी मेहनत घेतोच आहे. सोबतच भाषेवरही मी विशेष लक्ष देतो आहे. नेतोजी साकारण्यासाठी घाटावरची भाषा आत्मसात करत आहे.’ कश्यपला या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचा चाहता वर्ग देखील उत्सुक आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!