Share

डीआरएस मागताना रोहितची अजब स्टाईल पाहिलीत का?

Published On: 

मुंबई: भारतीय संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या टी २०सामन्यात वेस्ट इंडिजचा १७ धावांनी पराभव करत मालिका ३-० ने जिंकली आहे. या विजयामुळे भारतीय सांग आयसीसी टी २० संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची ही स्वप्नवत सुरुवात झाली आहे.

तिसऱ्या टी २० सामन्यात रोहितने तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करताना पाहिले. त्याने वेस्ट इंडिजच्या डावाच्या पहिल्याच षटकात पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले आणि सलामीवीर काइल मेयर्सला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याच्या अचूक निर्णयासोबतच, रोहितने DRS अजब स्टाईलने घेतला ज्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

‘T’ चिन्ह बनवण्याच्या त्याच्या या मजेशीर पद्धतीत आत्मविश्वास आणि खात्री दिसून आली. रोहितचा रिव्ह्यू कॉल योग्य ठरला कारण मेयर्सची बॅट दीपक चहरच्या चेंडूला लागत यष्टिरक्षक इशान किशनने क्लीन कॅच घेतल्याने विंडीजचा सलामीवीर सहा धावांवर बाद झाला. रोहितच्या योग्य निर्णयावर त्याचे नेटकार्यांनी कौतुक केले आहे. तसेच त्याचा फोटोही व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!