जालना: वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरत आहे. कोरोनाबाधितांसह इतर आजारांच्या रुग्णांकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक वेळा उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता देखील भासत असते. मात्र पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे जालना जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन टँक उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात सध्या २३ टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध असून दररोज सहा टन ऑक्सिजनचा वापर होत आहे.
वाढते कोरोना रुग्ण पाहता भविष्यात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन लिक्विड ऑक्सिजन टँक उपलब्ध करण्यात आले आहे. जर घराज भासलीच तर दिवसाला सरासरी सात टनापर्यंत याचा वापर होऊ शकतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जालना जिल्हा कोरोना परिस्थितीचा सामना करायला अधिक सज्ज झाला असल्याचे बघायला मिळत आहे.
पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅब, लिक्विड ऑक्सिजन टँक, नवीन कोविड हॉस्पिटल, अशा अनेक सोयी सुविधा जालना जिल्ह्यात उपलब्ध झाल्या आहेत. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णालयात खाटांची संख्या कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे, त्यामुळे ज्यांना सौम्य लक्षणे आहेत त्यांना घरीच आयसोलेट करण्यात यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच ज्या रुग्णांची स्थिती गंभीर आहे त्यांनाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मागील वर्षी थाळ्या हि वाजवल्या व “कोमट पाणी” ही प्यायले, पण आता…’; मनसेची खोचक टीका
- पूर्ण ताकतीने लॉकडाऊनच्या विरोधात मोर्चा काढणार : खा. इम्तियाज जलील
- निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेना आमनेसामने; शिंदेंनी केले गंभीर आरोप
- सिल्लोड मतदार संघासाठी अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे २५ लाखांच्या निधीला मंजुरी
- लॉकडाऊनमुळे राष्ट्रवादीत बिनसलं? आता प्रफुल्ल पटेल यांचाही विरोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

