Share

विमानाच्या पायऱ्या चढताना तोल गेल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन 3 वेळा पाय घसरला

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या वर्षात निवडणुकांच्या रणधुमाळी मध्ये सतत चर्चेत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या एका सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळे या व्हिडीओमध्ये विमानात प्रवेश करतावेळी पायऱ्यांवर त्यांचा तोल गेल्याचं दिसत आहे.

राष्ट्रपती जो बायडन शुक्रवारी अटलांटा दौऱ्यावर जात होते. जिथे त्यांना आशियाई-अमेरिकी समुदायाच्या नेत्यांसोबत अनेक महत्त्वांच्या विषयांवर चर्चा करायची होती. अटलांटा जाण्यासाठी ते एअरफोर्स वन विमानाच्या पायऱ्यांवरुन वरती विमानात जात होते. मात्र त्यांचं संतुलन ढळलं आणि त्यांचा दोन ते तीन वेळा तोल गेला. सुदैवाची गोष्ट म्हणजे पायऱ्यांवर पाय जरी घसरला तरी त्यांना यामध्ये कोणतीही दुर्घटना झालेली नाही.

https://twitter.com/Breaking911/status/1372946685328957442?s=20

अखेर सगळ्या पायऱ्या चढल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना नमस्कार करुन ते विमानात बसले. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी कैरिन जीन पियरे यांनी माध्यमांना सांगितलं की 100 टक्के तंदुरुस्त आहेत. कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही. पायऱ्यांवर चुकीची पावले पडल्याशिवाय याच्यात काहीही नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!